पुणे | दाभोलकरांच्या हत्येला पाच वर्ष, कुटुबियांची बातचित
У вашего броузера проблема в совместимости с HTML5
समाजाला विवेकाचा मार्ग दाखवण्यासाठी ज्यांनी संपूर्ण आयुष्य खर्च घातलं, त्या डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येला आज ५ वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी आज पुण्यासह अनेक शहरांमध्ये अंनिसनं मोर्चे काढले. सीबीआयनं दोनच दिवसांपूर्वी सचिन अंदुरेला अटक केली आहे. अंदुरेनंच दाभोलकरांवर गोळी झाडल्याचा दावा सीबीआयनं केला आहे. मात्र त्याच्यामागचा खरा सूत्रधार कोण, हे अद्याप कळू शकलेलं नाहीय. त्यामुळे खऱ्या सूत्रधारांपर्यंत तपासयंत्रणांचे हात पोहोचावेत, अशी मागणी अंनिसच्या कार्यकर्त्यांनी केली आहे. ५ वर्षापूर्वी सकाळी मॉर्निक वॉकला गेलेल्या डॉ. दाभोलकरांवर दोन दुचाकीस्वारांनी गोळ्या झाडल्या होत्या.