सफाळे-मालकरीपाड्याचा राजा॥ सार्वजनिक गणेशोत्सवाचे आकर्षण ठरले ते टाकाऊ वस्तुंपासुन केलेली सजावट
У вашего броузера проблема в совместимости с HTML5
#रविंद्रघरत
सफाळे परिसरातील नवतरुण मित्र मंडळ मालकरी पाडा येथे सार्वजनिक गणेशोत्सव उत्साहाने साजरा करण्यात आला .या मंडळाला यावर्षी 27 वर्ष पुर्ण झाले आहेत. यावर्षी नवतरुण मित्र मंडळाने उत्कृष्ट असे सजावट केली होती . या सजावटीसाठी चेतन कदम यांनी खुप मेहनत घेऊन बनवले असुन इतर सदस्यांनी साथ दिली. टाकाऊ वस्तूपासुन पुठ्ठे, गवत , पेपरापासुन दगडाची गुहा बनवण्यात आली आहे. त्या गुहेत श्री गणेश मूर्ती साकारण्यात आली होती. या वर्षी मंडळाने समोर मंडप टाकून सर्व परिसर स्वच्छ करुन चकाचक केला होता . संपूर्ण देशात महाराष्ट्र राज्याची संस्कृती, एकता टिकून आहे याचे सर्वात मोठे कारण असणार तर ते वारकरी संप्रदाय आहे. याच उद्देशाने नवतरुण मित्र यांनी भजन ठेवण्यात आले होते. तसेच रात्री दरवर्षी प्रमाणे गौरीचे नृत्य सादर करण्यात येते. गणपती उत्सव हा मोठ्या एकोप्याने व आनंद घेत संध्याकाळी गणेश विसर्जन दरम्यान भाविक मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.नवतरुण मित्र मंडळ यापुढे गणेशोत्सवाच्या निमित्ताने विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात कटिबद्ध राहील व इतर म॔डळा प्रमाणे प्रेरणा देणारे कार्य आमच्या कडुन करण्याचा प्रयत्न केला जाईल असे मंडळाचे अध्यक्ष रविंद्र घरत यांनी सांगितले.