माझा कट्टा : भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्याशी गप्पा
У вашего броузера проблема в совместимости с HTML5
काँग्रेससाठी एमआयएमला सोडणार नाही. एकदा मैत्री केली की केली, असे भारिप-बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर म्हणाले. ते एबीपी माझाच्या ‘माझा कट्टा’ या खास कार्यक्रमात बोलत होते. काँग्रेस ज्या 12 जागा सातत्याने पराभूत होत आलीय, त्या जागा आम्हाला द्याव्या, त्या जागांवर आम्ही लढतो, असे आम्ही काँग्रेसला सांगतो, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले. “महाराष्ट्रातल्या काँग्रेस नेत्यांना फार किंमत आहे, असे मला दिसलेलं नाही. मला कळायला मार्ग नाहीय, आम्ही कुणाशी बोललो, म्हणजे काँग्रेससोबत युती होईल.” असे म्हणत प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसोबतच्या चर्चेबद्दल गोंधळाचं वातावरण स्पष्ट केलं.