पुणे : तीन बांगलादेशी नागरिकांना अटक, तिघांचा अल कायदाशी संबंध असल्याचा संशय
У вашего броузера проблема в совместимости с HTML5
दहशतवाद विरोधी पथकाच्या पुणे युनिटकडून तीन बांगलादेशी नागरिकांना शनिवारी अटक करण्यात आली आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या या तिघांचे पाकिस्तानातील अल कायदा या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याचा पोलिसांना संशय आहे. कारण, बांगलादेशात दहशतवादी कारवायांमुळे बंदी असलेल्या अन्सरुल्लाह बांगला टीम या संघटनेचे सदस्य आहेत. ही संघटना अल कायदाशी संबंधीत संघटना आहे. एटीएसनं दिलेल्या माहितीनुसार हे तिघंजण तिशीतल्या वयोगटातले आहेत. मात्र तिघांची नावं अद्याप कळू शकलेली नाही
For latest breaking news, other top stories log on to: http://abpmajha.abplive.in/ & https://www.youtube.com/abpmajhalive