सुभाष भामरेंवर आमदार गोटेंची सडकून टिका | धुळे | एबीपी माझा
У вашего броузера проблема в совместимости с HTML5
आमदार अनिल गोटे हे स्वता धुळ्याच्या महापौरपदाची निवडणुक लढवणार आहेत...काल धुळ्यातल्या जाहीर सभेत त्यांनी याची घोषणा केली.. धुळे महापालिका निवडणुकीपासून भाजपनं आपल्याला दूर ठेवलं जात असल्याचा आरोप त्यांचा आहे.
तसंच धुळ्याचे खासदार सुभाष भामरे यांच्यासोबत त्यांचे मतभेदही असल्यामुळे त्यांच्यातला वाद विकोपाला गेला आहे. परवाच्या कार्यक्रमात त्याचं जाहीर प्रदर्शनही झालं. काल सभेत बोलत असताना गोटेंची अचानक शुगर वाढली.. त्यामुळे काही काळ सभा थांबवण्यातही आली.. दरम्यान, गोटे स्वतः महापौरपदाची निवडणूक लढवणार असले तरी भाजपतच राहणार हे त्यांनी स्पष्ट केलंय.. मात्र त्यांनी सुभाष भामरेंवर सडकून टीका केलीय.
For latest breaking news, other top stories log on to: https://abpmajha.abplive.in/ & https://www.youtube.com/c/ABPMajhaTV &
https://www.facebook.com/abpmajha/