У вашего броузера проблема в совместимости с HTML5
चर्चिल आलेमाव यांचा राष्ट्रवादीत प्रवेश ३२ वर्षांत चर्चिल यांनी बदलले सात वेळ पक्ष 'घड्याळा'च्या काट्यावर चर्चिल आजमावणार नशीब गेल्या ३२ वर्षांत सहा राजकीय पक्षात उड्या मारणारे चर्चिल आलेमाव यांनी बुधवारी सातवी राजकीय उडी मारत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जुझे फिलीप डिसोझा यांनी त्यांना 'राष्ट्रवादी'त रितसर प्रवेश प्रवेश दिला. voice over माजी बांधकाममंत्री चर्चिल आलेमाव यांनी बुधवारी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला. अडीच वर्षापूर्वी, लोकसभा निवडणुकीच्या वेळी २५ मार्च २०१४ रोजी चर्चिल यांनी सोनिया गांधी यांच्या काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देऊन ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षाशी सोयरीक जुळवली होती; मात्र तृणमूल कॉंग्रेस गोवेकरांवर छाप पाडू शकत नसल्याचं चर्चिल यांच्या लक्षात आलं. त्यामुळं येत्या निवडणुकीत चर्चिल या पक्षात राहाणार की दुसऱ्या पक्षाचा शोध घेणार अशी चर्चा राजकीय गोटात चालू होती. ही चर्चा चालू असतानाचं चर्चिल यांनी राष्ट्रवादीशी अनुसंधान साधले. आता शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळ चिन्हावर ते आपले राजकीय भवितव्य अजमावणार आहेत. एका पक्षातून दुसऱ्या पक्षात, असे करीत चर्चिल यांनी आपली राजकीय कारकिर्द लांबवली आहे. आतापर्यंत त्यांनी सात राजकीय उड्या मारल्या आहेत. आता घड्याळाचा काटा बाणावलीत चर्चिल यांना सत्ता मिळवून देण्यात यशस्वी होणार का? ते आता पाहावं लागणार आहे.