Jalgaon- शरद पवार यांचा जळगाव जिल्हा दौरा निश्चित | NCP Jalgaon | Sharad Pawar
У вашего броузера проблема в совместимости с HTML5
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पक्षाध्यक्ष शरद पवार हे दिनांक 15 रोजी जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत आहेत.
ते चोपडा येथील सहकारी सूतगिरणीचे उद्घाटन करून जळगावात जैन हिल्स येथे आप्पासाहेब पवार पुरस्कार वितरण सोहळ्याला उपस्थिती देत सायंकाळी मुक्ताईनगर येथील शेतकरी मेळाव्यात सहभागी होतील.
पवार यांच्या जिल्हा दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा कार्यकारिणीची बैठक बुधवारी घेण्यात आली यावेळी जिल्हाध्यक्ष अॅड.रवींद्र पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर, राष्ट्रवादी अल्पसंख्यांक विभागाचे प्रदेशाध्यक्ष गफ्फार मलिक, प्रदीप देशमुख, महिला आघाडीच्या अध्यक्षा कल्पना पाटील, महानगराध्यक्ष अभिषेक पाटील, आदींसह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.