सायंकाळी सातच्या बातम्या, दूरदर्शन सह्याद्री वाहिनी..(२४ नोव्हेंबर २०१७)
У вашего броузера проблема в совместимости с HTML5
ठळक बातम्या.....भिवंडीमध्ये चार मजली इमारत कोसळून ३ ठार आठ जखमी, आणखी काही जण ढिगाऱ्याखाली असण्याची शक्यता
दुसऱ्या एका घटनेत ठाण्यातल्या इमारतींचा स्लॅब कोसळून एक जण ठार तर चार जखमी
संसदेचं हिवाळी अधिवेशन १५ डिसेंबरपासून, सर्व पक्षांनी सहकार्य करण्याचं संबंधित मंत्र्यांचं आवाहन
अयोध्येतल्या वादग्रस्त भूमीवर कोणत्याही परिस्थितीत राममंदिर उभारलं जाईल - सरसंघचालक मोहन भागवत यांची ग्वाही
वस्त्रोद्योग राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांची आमदारकी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाकडून रद्द
इंधन आयातीवरचा खर्च करण्यासाठी इथेनॉलचा वापर वाढवणं आवश्यक - नितीन गडकरी यांचं मत
मुंबईतल्या फेरीवाल्यांची योग्य व्यवस्था केल्याशिवाय त्यांना हटवू नका अशी मागणी करणारी संजय निरुपम यांची याचिका सर्वोच्च न्यायालयानं
फेटाळली
हॉंगकॉंग सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धेत पी.व्ही.सिंधूची उपांत्य फेरीत धडक
नागपूर क्रिकेट कसोटीत पहिल्या दिवसअखेर भारताच्या एक बाद ११ धावा