अकराच्या बातम्या, दूरदर्शन सह्याद्री वाहिनी..(०८ फेब्रुवारी २०२०)
У вашего броузера проблема в совместимости с HTML5
ठळक बातम्या.....दिल्ली विधानसभेच्या सर्व ७० जागांसाठी आज मतदानाला सुरुवात, ११ फेब्रुवारीला मतमोजणी
कोरोना विषाणुमुळे चीनमधल्या बळींची संख्या ७२२ वर पोहोचली भारतात ४० हजार प्रवाशांची तपासणी
श्रीलंकेचे पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांचं पाच दिवसांच्या भारत भेटीवर नवी दिल्लीत आगमन, राष्ट्रपती भवनात आज औपचारिक स्वागत समारंभ
राज्यातल्या शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ देणारी महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजना येत्या १५ एप्रिलपर्यंत पूर्ण करण्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे निर्देश
भारत - न्यूझीलंडदरम्यान ऑकलंड इथं दुसरा एकदिवसीय क्रिकेट सामना सुरु, नाणेफेक जिंकून भारताचा क्षेत्ररक्षणाचा निर्णय
अंटार्टिका महासागरात १८ पूर्णांक ३ अंश सेल्सिअस इतक्या उच्चांकी तापमानाची नोंद..