सातच्या बातम्या, दूरदर्शन सह्याद्री वाहिनी..(०६ फेब्रुवारी २०२०)
У вашего броузера проблема в совместимости с HTML5
ठळक बातम्या.....रालोआ सरकारच्या दृढ इच्छाशक्ती आणि संवेदनशीलतेमुळे सत्तर वर्षापासूनचे प्रलंबित प्रश्न सुटले - राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभारदर्शक प्रस्तावावर उत्तर देताना पंतप्रधानांचं प्रतिपादन
सीएएबदल्लची वस्तुस्थिती माहीत असूनही केवळ मतपेढीच्या राजकारणासाठी विरोधकांचा अपप्रचारातून देशात दुही माजवण्याचा प्रयत्न - पंतप्रधानांची विरोधकांवर टीका
कलम ३७० रद्द केल्यानंतर पहिल्यांदाच जम्मू - काश्मीरमधल्या गरीबांना आरक्षणाचा लाभ, सर्व सरकारी योजना लागू उद्योगजगताचीही प्रगती - पंतप्रधानांचं राज्यसभेत प्रतिपादन
रिझर्व्ह बँकेचं चालू आर्थिक वर्षातलं सहावं आणि शेवटच्या द्वैमासिक पतधोरणात बँकेनं प्रमुख दरात कोणतेही बदल नाही, रेपो दर पाच पूर्णांक १५ शतांश टक्क्यांवर कायम
डोंबिवलीतल्या रासायनिक कंपन्यांनी त्वरीत सुरक्षा उपकरणं बसवावीत अन्यथा कंपन्या बंद कराव्यात - रासायनिक प्रदूषण रोखण्यासाठी मुख्यमंत्र्यांचा कंपन्यांना इशारा
एल्गार परिषद प्रकरणाचा तपास एनआयए कडे वर्ग करण्याबाबतच्या खटल्यावर पुणे विशेष न्यायालयात सुनावणी पूर्ण, उद्या निकाल अपेक्षित
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची महाभियोगाच्या खटल्यातून निर्दोष मुक्तता...