माझा विशेष | मुंबईला उपाशी ठेवण्याची धमकी देणारे संजय निरुपम कोण?
У вашего броузера проблема в совместимости с HTML5
लक्षात ठेवा मुंबई आणि महाराष्ट्र उत्तर भारतीय चालवतात... जर फक्त एक दिवस उत्तर भारतीयांनी काम केलं नाही ना, तर मुंबई ठप्प होईल... मुंबईकरांना जेवायला ( रोटी सब्जी ) मिळणार नाही... आम्हाला असं करायचं नाही... मात्र, तसं करण्यासाठी आम्हाला मजबूर करू नका, अशा शब्दात काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांनी मुंबईकरांना थेट धमकीच दिली आहे. नागपुरात उत्तर भारतीयांच्या वार्षिक सभेत बोलताना निरूपम यांनी ही आगपाखड केली. निरुपम एवढ्यावरच थांबले नाही. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही इशारा दिला. उद्योगपती विजय मल्ल्याला पळवण्यामागे 95 कोटींची डील झाल्याचा आरोपही त्यांनी केला.