जवानांच्या शौर्याचं राजकारण नको, 156 माजी सैनिकांचं राष्ट्रपतींना पत्र | एबीपी माझा
У вашего броузера проблема в совместимости с HTML5
लष्करी कारवाईचं श्रेय़ घेणाऱ्या राजकीय नेत्यांवर आक्षेप घेणारं पत्र माजी सैनिकांनी राष्ट्रपतींना लिहिलंय. या पत्रावर 156 माजी सैनिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत. तर, या 156 माजी सैनिकांमध्ये माजी लष्करप्रमुख जनरल दीपक कपूर यांचाही समावेश आहे.
दरम्यान, मोदींनीही लातूरमधील सभेत पहिल्यांदा मतदान करणाऱ्या मतदारांना सैनिकांच्या शौर्याला मत समर्पित करण्याचं आवाहन केलं होतं. मात्र, माजी सैनिकांच्या स्वाक्षरी असलेलं पत्र मिळालं नसल्याचं स्पष्टीकरण राष्ट्रपती भवनाकडून देण्यात आलंय.
For latest breaking news, other top stories log on to: https://abpmajha.abplive.in/ & https://www.youtube.com/c/ABPMajhaTV &
https://www.facebook.com/abpmajha/