У вашего броузера проблема в совместимости с HTML5
सध्या देशात मेड इन इंडियाचं फॅड सुरु आहे... आतापर्यंत आपण स्वदेशी विमान पाहिलं आहे, मात्र सांगलीच्या एका तरुणाने स्वदेशी बनावटीचं हेलिकॉप्टर तयार केलं आहे. अवघं दहावीपर्यंत शिक्षण झालेल्या प्रदीप मोहितेने हेलिकॉप्टर तयार करुन लहानपणीचं स्वप्न साकारलं आहे. लहानपणापासूनच प्रदीपला हेलिकॉप्टर साकारण्याचे स्वप्नं होतं. 2009 साली आमीर खानचा 'थ्री इडियट्स' हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि प्रदीपची उमेद पुन्हा जागी झाली. आणि प्रदीपनं एक-दोन नव्हे तर सात हेलिकॉप्टर साकारली आहेत. या वेडापायी गेल्या नऊ वर्षात प्रदीपने चाळीस लाख रुपये खर्ची घातले आहेत. आता प्रदीपला या हेलिकॉप्टरचं पेटंट मिळालं आहे. प्रदीपचं हेलिकॉप्टर पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर नागरिक गर्दी करत आहेत.