घाटकोपरमध्ये टाकाऊ वस्तूंपासून चिमुकल्यांनी बनवला प्रतापगड | मुंबई | एबीपी माझा
У вашего броузера проблема в совместимости с HTML5
दिवाळी सणाला सुरुवात होताच बालदोस्तांना वेध लागतात ते दिवाळीत किल्ले बनविण्याचे... घाटकोपरमधल्या पारशीवाडीतील लहान मुलांनी टाकाऊ वस्तूंपासून प्रतापगड किल्ला बनवला आहे. सहा फूट रुंद आणि दोन फूट उंच असा हा प्रतापगड साकारलाय. प्लास्टिकच्या बॉटलपासून तोफ, बॉक्सच्या पुठ्ठयांपासून गडाचे दरवाजे, सिमेंटचे तुटलेले पेव्हर ब्लॉक आणि विटांपासून गडाची तटबंदी तयार केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती त्या किल्ल्यावर विराजमान करून त्यासमोर मावळे आणि भगवे झेंडेही लावण्यात आले आहेत. त्याच्या बाजूने गवताचे सुंदर असे नक्षीकाम करून हा किल्ला हुबेहूब साकारण्याचा या मुलांनी प्रयत्न केलाय. हा किल्ला सध्या कौतुकाचा विषय झाला आहे.