Diwali is a festival of lights. Its celebrated all over India. We follow this tradition for centuries .. but do we know the religious , historical, social or scientific thoughts behind this festival. Let's learn more about this festival.

*नरकचतुर्दशी व लक्ष्मीपूजन *
"ठीक आहे, धनत्रयोदशीला आपण धन्वंतरीची पूजा करतो हे समजले. पण आता मला सांग नरकचतुर्दशी च्या दिवशी श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केला, मग अभ्यंगस्नान ही प्रथा कशी सुरु झाली ?" मित्राने पलटवार केला " दानशूर बळीने गुरु शुक्राचार्यांच्या सूचनेचे पालन का केले नाही ? आणि जर लक्ष्मीपूजनाच्या दिवशी भगवान विष्णूने बळीस पाताळात धाडले तर त्या दिवशी लक्ष्मीपूजन का बरे केले जाते ? एकुणातच पुरणकथा आणि परंपरा आपल्याला कोडयात टाकतात नाही ?" असे अनेक प्रश्न त्याला पडलेले आहेत म्हणूनच *चला सणांविषयी थोडे अधिक जाणून घेऊ यात*
आपण सारेच सण उत्साहाने साजरे करतो. दिवाळी तर खास करून. नवे कपडे, गोडधोड , फटाके यांची रेलचेल. अभ्यंग स्नान, पहाटेचा पहिला फटाका, लक्ष्मीपूजनाचा मुहुंत , पाडव्याच्या - भाऊबिजेच्या भेट वस्तू ... एकुणातच धमाल. पण कधी तुम्हाला असा प्रश्न पडतो का , की ह्या सणाची सुरुवात कशी झाली असेल ? वसुबारस , धनत्रयोदशी , यमद्वितीया आणि एकुणातच दिवाळीच्या पाचही दिवसांचे सांस्कृतिक , पौराणिक , सामाजिक व शास्त्रीय महत्व काय ? हे आपणच जर जाणून घेतले नाही तर आपण ही परंपरा अतिशय चौकस अश्या पुढच्या पिढीला कशी समजावणार. त्या साठी हा एक छोटा प्रयत्न