टाकाऊ पासून टिकाऊ - वैशाली पाटील भडगाव @pbcmatrubhumi
У вашего броузера проблема в совместимости с HTML5
गृहिणीना लक्ष्मी म्हणतात,याचा प्रत्यय आल्यावाचून राहत नाही,कोंड्याचा मांडा करून संसार समृद्ध करणाऱ्या माता भगिनी आपण दैनदिन जीवनात बघत असतो.झोपडीची उपरी होतेच.फक्त त्यासाठी आवश्यक असते ती म्हणजे आवड अशीच एक आवड सौ वैशाली पाटील यांनी जोपासलेली आहे.स्वयंपाक घरातील इतरांच्या दृष्टीने असलेला घनकचरा नगरपालिका नेतेच मात्र यापासून आपणास वेगळं काही करता येईल का ? हा प्रयन्त आणि आपल्या प्रधानमंत्राच्या सुयोग्य अशा “भारत स्वच्छ अभियान” यांस खारीचा का होईना वाटा उचलण्याचा हा थोडासा प्रयन्त !
त्यांनी स्वयंपाकातील खरगटे,बाजारातून आणलेल्या भाजीपाल्यातील भाजी नीट केल्यानंतर राहिलेले अवशेष,यांना एका मातीच्या मटक्यामध्ये प्रथम तळाला काळी माती घालून मटक्याला सर्व बाजूंनी छिद्र तयार केले,जेणेकरून पाण्याचा योग्य निचरा व्हावा व हवेशीर वातावरण तयार होण्यास मदत व्हावी.