У вашего броузера проблема в совместимости с HTML5
कळले तुला काही कळले मलाही झुकला शिरी मेघ, विझल्या दिशाही कसे काय गाऊ, कुठे शब्द मागू सुखांच्या फुलांचा कसा गंध सांगू नवख्या वयाला ये जाण काही असा धुंद वारा असा चंद्र तारा अशा उंच लाटा बुडाला किनारा कशी लाट गेली कुणा भान नाही गीत - शांता शेळके संगीत - पं. हृदयनाथ मंगेशकर स्वर - लता मंगेशकर चित्रपट - हे गीत जीवनाचे (१९९५)