कांदा निर्यात बंदी वर महत्वाची बातमी/Kanda niyat bandi beking news,
У вашего броузера проблема в совместимости с HTML5
निर्यात बंदी विषयक ब्रेकिंग न्युज महाराष्ट्र राज्य कांदा निर्यातबंदी लवकर हटवणार का ब्रेकिंग न्यूज बघा
Onion market report today
लासलगाव बाजार समितीच्या कांदा लिलावाची केंद्रीय पथकाने पाहणी केली. या पाहणी दरम्यान कांदा लिलाव पद्धत तसंच लिलावासाठी येत असलेली आवक आणि बाजारभावाचीही पथकाने माहिती घेतली. या पाहणीवेळी कांद्यावरील निर्यातबंदी उठवण्याची शेतकरी तसंच बाजार समिती प्रशासनानं केंद्रीय पथकाकडे मागणी केली.
कांद्याच्या बाजार भावात होत असलेली घसरण त्या पार्श्वभूमीवर निर्यातबंदी उठविण्याची वारंवार होत असलेली मागणी पाहतात केंद्रीय पथकाने लासलगाव बाजार समितीस भेट देऊन कांदा लिलाव, कांद्याची दररोज होणारी आवक आणि बाजारभावाची माहिती घेऊन पाहणी करत माहिती जाणून घेतली
यंदाच्या पावसाच्या हंगामात लांबलेला पाऊस आणि नोव्हेंबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाने शेती पिकाचे मोठे नुकसान झाले होते यात कांदा पिकाचे मोठे नुकसान होत कांद्याची आवक बाजार समित्यांमध्ये मंदावल्याने देशांतर्गत मागणीच्या तुलनेत पुरवठा होत नसल्याने लासलगाव बाजार समितीत ११ हजार १११ रुपये इतका उच्चांकी कांद्याला एतिहासिक बाजार भाव मिळाला होता. आज कांद्याला सरासरी पंधराशे ते अठराशे रुपये बाजार भाव मिळत असल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे झालेले नुकसान आणि मिळालेले उत्पादन याला आलेला खर्चही निघणे मुश्किल झाले आहे. यामुळे कांद्याची निर्यात बंदी उठवण्याची मागणी जोर धरत आहे.
#निर्यातबंदी_वरती_ब्रेकिंगन्यूज