Saturday, 13 September, 2025г.
russian english deutsch french spanish portuguese czech greek georgian chinese japanese korean indonesian turkish thai uzbek

пример: покупка автомобиля в Запорожье

 

How to Create YouTube Channel in Marathi मराठी युट्युब चॅनल कसे तयार करायचे?

How to Create YouTube Channel in Marathi मराठी युट्युब चॅनल कसे तयार करायचे?У вашего броузера проблема в совместимости с HTML5
यू टय़ूब चॅनेलचा वापर कसा करावा? यू टय़ूब चॅनेल तयार केल्यानंतर तुम्ही त्यावर तुम्हाला हवे ते व्हिडीओ अपलोड करू शकता. त्यासोबत हे व्हिडिओ संपादित करण्याची सुविधाही तुम्हाला उपलब्ध करून देण्यात आली आहे. यू टय़ूब चॅनेलला जास्त आकर्षक करून प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेण्याकरिता तसेच चॅनेल सुरक्षित ठेवण्यासाठी विविध सेटिंग्जमध्ये उपलब्ध  आहेत. व्हिडीओ अपलोड करण्यासाठी व्हिडीओ मॅनेजरची मदत घेता येते. ‘व्हिडीओ’ची निवड यू टय़ूब चॅनेलवर अपलोड करण्यासाठी व्हिडीओ निवडताना तो सार्वजनिक होणार आहे, याची सर्वप्रथम खबरदारी घेणे आवश्यक आहे. तसेच तुमचा व्हिडीओ वैशिष्टय़पूर्ण विषयाचा किंवा आकर्षक चित्रण असलेला असेल तरच, तो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल आणि तुम्हाला जास्तीत जास्त प्रेक्षकसंख्या मिळेल, हे नेहमी लक्षात ठेवा. तुमच्या यू टय़ुब चॅनेलवर तुम्ही तयार केलेले व्हिडीओच अपलोड करा. अन्य कोणतेही व्हिडीओ अपलोड करून कॉपिराइट शर्तीचा भंग करणे महागात पडू शकते. यू टय़ूब चॅनेल सुरू कसा करावा? स्वत:चे यू टय़ूब चॅनेल सुरू करणे अतिशय सोपे आहे. यासाठी तुमच्याकडे गुगलचे अकाऊंट असणे आवश्यक आहे. गुगल अकाऊंटवर ‘साइन इन’ केल्यानंतर यू टय़ूबचे संकेतस्थळ सुरू करा. ‘यू टय़ूब’ संकेतस्थळाच्या मुख्य पानावर उजव्या बाजूला वरच्या कोपऱ्यात तुमच्या खात्याचे ‘प्रोफाइल फोटो’ दिसेल. त्यावर क्लिक करताच तुम्हाला गुगल अकाऊंटचा मेन्यू दिसेल. त्यातील ‘माय चॅनेल’ वर (My Channel) क्लिक करा. यातच तुम्हाला ‘क्रिएट युअर यू टय़ूब चॅनेल’ (Create Your YouTube channel) हा पर्याय दिसेल. खुल्या होणाऱ्या पानावर तुम्हाला तुमचा प्रोफाइल फोटो तसेच ‘युजरनेम’ दिसेल. त्या ठिकाणी असलेल्या ‘एडिट’ बटणावर क्लिक करा आणि तुमच्या ‘गुगल प्रोफाइल’मध्ये आवश्यक बदल करा. यामध्ये तुम्हाला तुमची कोणती माहिती सार्वजनिक करायची आहे, ते विचारण्यात येईल. यानंतर ‘Activities you’ll share on your channel या पर्यायाखाली तुम्हाला ‘लाइक अ व्हिडीओ’, ‘कमेंट अ व्हिडीओ’, ‘फेव्हरिट अ व्हिडीओ’ आणि ‘सबस्क्राइब टू अ चॅनेल’ असे पर्याय दिसतील. यातील तुम्हाला हवे तितके पर्याय निवडा. यानंतर ‘ओके’ बटणावर क्लिक करा. तुमचे यू टय़ूब चॅनेल हाताळण्यासाठी तयार झाले आहे. आता तुम्ही यावर व्हिडीओ अपलोड करू शकता. चॅनेलमधून अर्थार्जन यू टय़ूब चॅनेलवरील व्हिडीओद्वारे पैसे मिळवण्यासाठी गुगल अ‍ॅडसेन्स अकाऊंट तयार करावे. हे अ‍ॅडसेन्स गुगलच्या जाहिरातीच्या माहितीचे ऑफिशिअल टूल आहे. इथे तुम्हाला तुम्ही अपलोड केलेल्या तुमच्या व्हिडीओसंदर्भात कुणी आणि किती जणांनी व्हिडीओ पाहिला, त्यांच्या कमेंट्स किती वगैरे सर्व माहिती मिळते. तसेच एखाद्या व्हिडीओच्या जाहिरातीतून किती पैसे मिळतील याचीही माहिती तुम्हाला मिळते . अ‍ॅडसेन्स अकाऊंट तयार केल्यानंतर यू टय़ुबच्या सेटिंग्जमध्ये असलेले यू टय़ूब चे ‘मोनेटायझेशन फीचर’ सुरू करावे. मोनेटायझेशन सुरू केल्यानंतर यू टय़ूबकडून तुमच्या माहितीची सविस्तरपणे शहानिशा केली जाते आणि तुम्हाला व्हिडीओच्या माध्यमातून पैसे कमावण्यासाठी परवानगी दिली जाते. तुम्हाला जाहिराती निवडण्याचा पर्याय उपलब्ध असतो या मोनेटायझेश फीचरमुळे तुमच्या व्हिडीओमध्ये जाहिराती दिसण्यास सुरुवात होऊन त्याचे पैसेही तुम्हाला मिळण्यास सुरुवात होते. तुमच्या आवडीच्या विषयांची माहिती, खेळाची, रेसिपीची माहिती व्हिडीओच्या रूपात तुम्ही तुमच्या चॅनेलवर अपलोड करू शकता. आणि आवडीच्या तसेच छंदाच्या माध्यमातून तुम्ही पैसे कमवू शकता. फॅशन, धार्मिक, संगीत, न्यूज, बिझनेस, कला, कॉमेडी यांचे हटके व्हिडीओ बनवून अनेक लोक पैसे कमावत आहेत. तुमच्या यू टय़ूब चॅनेलवर व्हिडीओ अपलोड झाले आणि त्यावर जाहिराती सुरू झाल्या तर पैसे मिळायला सुरू होतात. १०० डॉलरची कमाई झाल्यावर पैसे तुमच्या अकाऊंटवर जमा होतात. यू टय़ुबवर व्हिडीओ अपलोड केल्यानंतर फेसबुक, ट्विटर या शेअर सोशल मीडियावर व्हिडीओची लिंक शेअर केल्याने व्हिडीओच्या हिट्स वाढतात. जेवढय़ा जास्त हिट्स, तेवढय़ा मोठय़ा प्रमाणात तुम्हाला पैसे कमवता येतात. https://www.loksatta.com/kutumbkatta-news/how-to-open-youtube-channel-ideas-for-youtube-channel-1614340/
Мой аккаунт