Sunday, 14 September, 2025г.
russian english deutsch french spanish portuguese czech greek georgian chinese japanese korean indonesian turkish thai uzbek

пример: покупка автомобиля в Запорожье

 

Hibiscus rosa-sinensis or velvet flower and Plant गुलाबी जास्वंद आणि फुले

Hibiscus rosa-sinensis or velvet flower and Plant   गुलाबी जास्वंद आणि फुलेУ вашего броузера проблема в совместимости с HTML5
वनस्पतिशास्त्रीय नाव: Hibiscus rosa-sinensis L. कुळ: Malvaceae इतर भाषांतील नावे: जास्वंद (मराठी), हरिवल्लभ, जयपुष्पी, रक्तपुष्पी, रुद्रपुष्पी, जपा(संस्कृत), अरुणा, जासूद (हिंदी), Shoeflower, Hibiscus (इंग्रजी) अन्य नावे - जासुम, जवाकुसुम, रोझेला, जमेका सॉरेल, वगैरे. "शू-फ्लॉवर' हे नाव असल्याचे कारण जास्वंदीची फुले काळ्या चामडी बुटांवर घासली तर पॉलिश केल्याप्रमाणे बूट चकाकतात. {{जीवचौकट । किंगडम(कोटी)=वानसकोटी प्लांट किंगडम | डिव्हिजन(विभाग) =पूषोद्भिद Phanerogams । क्लास(वर्ग) = (Dicotyledons) द्विदली । (Sub Class) उपवर्ग = (Polypetalae) मुक्तप्रदल । (Series) श्रेणी = (Thalamiflorae) पुष्पासनी । ( Order) गोत्र = ( Malvales) कार्पास | (Family) कुळ = (Malvaceae) भेंडीकुळ । प्रजाति(Genus)= (Hibiscus) | जाति(Species) = (rosa-sinensis) }} |(Botanical Name) वनस्पतिशास्त्रीय नाव = Hibiscus rosa-sinensis L. |(Vernacular Name) देशी नाव = जास्वंद. }} जास्वंद हे एक फुले देणारी वनस्पती आहे. भारतातील जास्वंदी ही बहुधा झुडुपस्वरूप असते. जास्वंदीच्या फुलांना सुगंध नसला, तरीही ती वनस्पती बरीच लोकप्रिय आहे. साहजिकच हे फूल अनेक घरांच्या सभोवताली दिसून येते. जास्वंदीची श्वेत, लालबुंद, पीतरंगी, भगवी, गुलाबी किंवा जांभळी फुले सार्वजनिक उद्यानांत उठून दिसतात. जास्वंदीमध्ये एक हजार सूक्ष्म रंगच्छटा आहेत. नजरेत भरणारा रंग आणि पाच पाकळ्यांनी मनोहारी बनलेल्या जास्वंदीच्या फुलाचे बाह्यस्वरूप आकर्षक असते. मधमाश्‍या, फुलपाखरे आणि काही पक्षी या फुलाकडे आकर्षित होतात. पण हे फूल फार काळ टिकत नाही. सकाळी टवटवीत सौंदर्य उधळणारे हे फूल संध्याकाळी मलूल दिसते. जास्वंदवर्गीय वनस्पतींचे सुमारे सव्वादोनशे प्रकार आहेत. त्यातील काही पाच-सहा मीटर उंच वाढतात. उंच वाढणार्‍यांत "हिबिस्कस कॅनाबिनस' ही जात असून, ती त्याच्या लाकडासाठी प्रसिद्ध आहे. भरपूर सेल्युलोजयुक्त कर्बोदके असलेल्या या वनस्पतीला "केनाफ' म्हणतात आणि कागदनिर्मितीच्या उद्योगात तो एक महत्त्वाच कच्चा माल आहे. काही प्रकारांमधील फुलांना मंद सुगंध असतो. तागाच्या वनस्पतीचे जसे तंतू निघतात, त्याप्रमाणे "हिबिस्क्‍स सब्दारिफा' या वाणाचेही शोभिवंत धागे निघतात. काही देशांमध्ये त्याचा स्कर्ट बनवतात. तसेच धाग्यांचा उपयोग केसांचा टोप बनविण्याकरितादेखील केला जातो. जास्वंदीच्या फुलांचा उपयोग केस धुण्यासाठी होतो. जास्वंदीच अर्क घातलेले केशतेल जबाकुसुम म्हणून प्रसिद्ध आहे. शाम्पूमध्ये एक घटक म्हणून जास्वंदीच्या पाना-फुलांच्या अर्काचा समावेश होतो. इजिप्तमध्ये ते लघवी साफ होण्यासाठी डाययुरेटिक (मूत्रल) म्हणून वापरतात. इराणमधील वैद्य रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी एक घटक म्हणून त्याचा वापर करतात. ही वनस्पती एक सौम्य रेचक म्हणूनही उपयोगात येते. नायजेरियात पोट साफ करण्यासाठी, तर काही देशांमध्ये चक्क भाजी करण्यासाठी त्याचा उपयोग करतात. अनेक महिला फुलांमधील नानाविध रंग सरबतांसाठी किंवा जाम-जेलीसारख्या खाद्यपदार्थांमध्येही वापरतात. काही फुलांचा रंग उकळत्या पाण्यात बाहेर पडतो. मेक्‍सिकोमध्ये तर जास्वंदीच्या वाळलेल्या फुलांपासून एक चविष्ट खाद्यपदार्थ तयार केला जातो. जास्वंदाचा समावेश असलेल्या चहाच्या डिप-डिप पुड्या हा एक फार मोठी जागतिक बाजारपेठ लाभलेला व्यवसाय आहे. चहाला लालसर किंवा पिवळसर रंग प्राप्त व्हावा म्हणून वेगवेगळ्या रंगांच्या फुलांचा वापर केला जातो. याचे रंगीत पेय हे शीत किंवा गरम पेय म्हणून वापरता येतं. या गरम पेयामार्फत सूक्ष्म प्रमाणात लोह, ताम्र, जस्त (झिंक), ब-१, ब-२ आणि क ही जीवनसत्त्त्वे शरीराला मिळू शकतात. या पेयाच्या सेवनामुळे अपायकारक लो डेन्सिटी कोलेस्टेरॉल कमी होते आणि हितकारक हाय डेन्सिटी कोलेस्टेरॉल वाढते. तसेच रक्तशर्करा, रक्तदाब नियंत्रणात राहण्यासाठी मदत होते. हे पेय पाचक आहे. ज्याला तीव्र उदासीनतेची बाधा झाली आहे, त्यांच्यासाठी जास्वंदयुक्त चहा गुणकारी असल्याचे निष्कर्ष प्राप्त झालेले आहेत. जास्वंदीच्या फुलांचे असे काही गुणधर्म आधीपासूनच माहिती झालेले असले, तरी त्यासंबंधीचे सखोल संशोधन चालूच असते. जास्वंदीमुळे चहाला लाल किंवा पिवळसर रंग येण्याचे कारण म्हणजे फुलात असलेली फ्ल्याओनाईड, डेल्फिनिडिन, सायनिडिन, अन्थोसायनिंस ही सेंद्रिय द्रव्ये.. शरीरातच तयार होणारी फ्री-रॅडिकलवर्गीय रसायने निष्प्रभ करणे गरजेचे असते. त्याकरिता हिबिस्कसच्या चहात जे प्रोटोकॅटेचुइक आम्ल असते, ते अॅन्टि-ऑक्‍सिडन्ट म्हणून उत्तम कार्य करते.
Мой аккаунт