У вашего броузера проблема в совместимости с HTML5
राजस्थानी समाजात गणगौर हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो . विशेष करून महिला या सणाची मोठ्या आतुरतेने वाट बघत असतात . हिंगोली शहरातील अग्रवाल बालाजी मंदिर येथे महाराष्ट्र राज्य अग्रवाल महिला सम्मेलन ,अग्रवाल महिला मंडळ,अग्रवाल बहू मंडळ यांच्या वतीने गणगौर चा कार्यक्रम मोठ्या आनंदात साजरा करण्यात आला . यावेळी विविध कार्यक्रम घेण्यात आले. चैत्र शुक्ल द्वितीया ला गणगौर हा सण साजरा केला जातो . गणगौर इसरजी म्हणजेच महादेव आणि पार्वती च रूप मानलं जाते . एकेकाळी महादेव व पार्वती फिरत असतात फिरता फिरता दोघांमध्ये काही कारणामुळे वाद निर्माण होतो . पार्वती माता स्वतःच्या माहेरी निघून जाते . अखेर महादेव पार्वती देवीला परत आणण्यासाठी जातात . तेथूनच गणगौर सणाची सुरुवात करण्यात आली . पहिले आठ दिवस गणगौर माता ची पुजा केली जाते व नंतर इसरजी गणगौर मातेला घ्यायला येतात तेव्हा दोघांची एकत्र पूजा केली जाते . माहेरी व सासरी सुख समृद्धी नांदावे,सर्व जण आनंदी निरोगी राहावे अशी गणगौर मातेला व इसरजी यांना प्रार्थना केली जाते . सुवासिनी महिला या सणात मोठ्या हिरहिरीने भाग घेतात . महाराष्ट्र राज्य अग्रवाल महिला सम्मेलन ,अग्रवाल महिला मंडळ,अग्रवाल बहू मंडळ यांच्या तर्फे घेण्यात आलेल्या गणगौर च्या कार्यक्रमात नवीन पदाधिकाऱ्यांचे सत्कार करण्यात आले . या नंतर विविध कार्यक्रम घेण्यात आले . मोठ्या आनंदात महिलांनी नृत्य सादर केले .