नमस्कार, आज मस्त अशी काळं मटणची रेसिपी पाहणार आहोत. त्यासाठी लागणारे साहित्य आणि कृती पुढीलप्रमाणे आहे.
साहित्य:-
●मटण ७६० ग्रॅम ●मधताम आकाराचे कांदे ४ ●मध्यम आकाराची पाऊण खोबरं वाटी ●काळा मसाला ३-४ चमचे (किंवा कुठलाही घरगुती मसाला) ●कोथिंबीर १ वाटी ●लसनाच्या पाकळ्या १५-२० ●आलं २" ●तेल १/४ वाटी ●हळद १ चमचा ● दही 2 चमचे ●मीठ चवीनुसार.
कृती:-
१】मटणाचे काप स्वछ धुवून घ्यावेत. २】मिक्सरच्या भांड्यात कोथिंबीर,लादून,आलं पाणी न घालता वाटून घ्यावे. ३】वाटलेल्या वाटणातील १-२ चमचे वाटण,दही,मीठ,हळद मटनाला लावून १/२ तासासाठी ठेवावे.४】१/२ तासांनी कूकरमध्ये २ चमचे तेल तापवून त्यात खडा मसाला घालावा,आणि हळद,मीठ,दही लावलेलं मटण घालावे. तेलात काही सेकंद परतून त्यावर पाणी भरलेलं ताट ठेवावं आणि १५ मिनिटे मध्यम आचेवर शिजू द्यावं. ५】नन्तर उकळी आलेलं पाणी कूकरमध्ये ओतून कूकरच्या ४-५ शिट्या होऊ द्याव्यात. ६】मटन शिजले की गॅस बंद करून ठेवावा. ७】काळ्या वाटनासाठी कांदा खलबत्याने ठेचून घ्यावा. ८】आणि आख्खाच गॅस वर काळसर भाजून घ्यावेत तसेच खोबऱ्याची वाटी पण भाजून घ्यावी. ९】कांदा खोबरं थंड करून त्याचे बारीक तुकडे करावेत,आणि पाणी न घालता मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यावं. १०】कढईत तेल तापवून त्यात कोथिंबीरीचं वाटण घालावं. आणि चांगलं परतावं. १२】कोथिंबिरीची पेस्ट चांगली परतली की त्यात काळ वाटण घालून परतावं. ९】दोन्ही वाटण छान तेल सुटेपर्यंत परतल्यावर त्यात काळा मसाला २ मिनिटे भाजावा. उकडलेले मटण पाण्यासाहित घालून १० मिनिटे झाकून शिजवावं. १३】१० मिनिटांनी गॅस बंद करून सर्व्ह करावं.
#traditionalmarathimuttonrecipe#authentickaalamuttonrecipe#assalgavranmutton#kaalmutton#marathimuttoncurry#muttoncurry#marathwadamuttoncurry#marathimuttonrecipe#maharashtriannonvegrecipe#tanujasanap#tanujasrecipe#tanujasbramharpan#muttonrecipe#काळंमटण#nonvegrecipe